क्राईम

गे डेटिंग APP वर आधी चॅटिंग, मग सापळा; तरुणाला लुटणारे आरोपी अवघ्या तीस मिनिटांत वारजे पोलिसांच्या ताब्यात.


साद-प्रतिसाद ऑनलाईन.

वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथील फिर्यादी यांना गे डेटींग अॅण्ड चॅट या अॅपद्वारे चॅटिंग करून बोलावून घेवून त्याला मारहाण करून मोबाईलद्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर केले व त्याची चांदीची चैन हिसकावून घेतल्यामुळे फिर्यादी यांच्या तक्रारीवरून वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा चार अनोळखी इसमांविरूध्द दि. ०८/०५/२०२६ रोजी दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने श्री. महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांनी तात्काळ तपास पथकाचे प्रभारी संजय नरळे, पोलीस उपनिरीक्षक यांना त्यांच्या स्टाफकरवी आरोपींचा शोध घेण्याबाबत मौखिक आदेश दिले होते.

लागलीच तपास पथकाचे प्रभारी संजय नरळे, पोलीस उपनिरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी यांच्याशी बोलून आरोपींबाबत माहिती घेत आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच पोलीस अंमलदार बालाजी काटे व महादेव शिंदे यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सदरची जबरी चोरी करणाऱ्या इसमांपैकी एक इसम हा अतुलनगर चौकात थांबलेला आहे.

सदरची माहिती प्राप्त होताच संजय नरळे, पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या सोबत पोलीस अंमलदार बालाजी काटे, महादेव शिंदे व निखील तांगडे असे माहितीच्या ठिकाणी रवाना होवून तेथून एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्या आणखी एका अल्पवयीन साथीदारालासुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.

दाखल गुन्ह्याचा पुढील तपास शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर हे करीत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश बोळकोटगी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गे डेटींग अॅण्ड चॅट व इतर अॅपद्वारे लोकांनी अशाप्रकारे फसवणुकीला बळी पडू नये. तसेच कोणाची अशाप्रकारची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तात्काळ वारजे माळवाडी पोलीस ठाणे किंवा आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जावून तक्रार द्यावी.

सदरची कारवाई मा. श्री अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री संभाजी कदम, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ पुणे शहर, मा. सुजाता तानवडे, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर, यांच्या सूचनेनुसार व श्री. महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रकाश धेंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वारजे माळवाडी पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, शरद पोळ, निखील तांगडे, अमित जाधव, अमित शेलार, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे, सागर कुंभार, अमोल सुतकर यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »