क्राईम

गे अॅपवर आधी चॅटिंग, मग सापळा; तरुणाला लुटणारे आरोपी अवघ्या तीस मिनिटांत वारजे पोलिसांच्या ताब्यात पुणे : गे डेटिंग अॅण्ड चॅट अॅपवरून ओळख वाढवत तरुणाला भेटीसाठी बोलावून त्याला मारहाण करत मोबाईलद्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून चांदीची चैन हिसकावणाऱ्या आरोपींना वारजे माळवाडी पोलिसांनी अवघ्या तीस मिनिटांत ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली आहे. फिर्यादी यांना गे डेटिंग अॅण्ड चॅट अॅपवरून संपर्क साधत आरोपींनी भेटीसाठी बोलावले होते. ठरलेल्या ठिकाणी आल्यानंतर फिर्यादी यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी मोबाईलद्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून घेतले तसेच त्यांच्या गळ्यातील चांदीची चैन हिसकावून पसार झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश बोळकोटगी यांनी तात्काळ तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी फिर्यादींकडून माहिती घेत आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. दरम्यान, पोलीस अंमलदार बालाजी काटे आणि महादेव शिंदे यांना गोपनीय माहितीदारामार्फत आरोपींपैकी एक इसम अतुलनगर चौक परिसरात थांबलेला असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, महादेव शिंदे आणि निखील तांगडे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या तीस मिनिटांत आरोपींना ताब्यात घेत वारजे माळवाडी पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या जलद तपास आणि प्रभावी कारवाईची छाप उमटवली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील हे करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश बोळकोटगी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, डेटिंग आणि सोशल चॅट अॅप्सद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे. अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्यासह पोलीस अंमलदार बालाजी काटे, शरद पोळ, निखील तांगडे, अमित जाधव, अमित शेलार, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे, सागर कुंभार आणि अमोल सुतकर यांनी सहभाग घेतला.


साद – प्रतिसाद ऑनलाईन.

पुणे : गे डेटिंग अॅण्ड चॅट अॅपवरून ओळख वाढवत तरुणाला भेटीसाठी बोलावून त्याला मारहाण करत मोबाईलद्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून चांदीची चैन हिसकावणाऱ्या आरोपींना वारजे माळवाडी पोलिसांनी अवघ्या तीस मिनिटांत ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली आहे.

फिर्यादी यांना गे डेटिंग अॅण्ड चॅट अॅपवरून संपर्क साधत आरोपींनी भेटीसाठी बोलावले होते. ठरलेल्या ठिकाणी आल्यानंतर फिर्यादी यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी मोबाईलद्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून घेतले तसेच त्यांच्या गळ्यातील चांदीची चैन हिसकावून पसार झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश बोळकोटगी यांनी तात्काळ तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी फिर्यादींकडून माहिती घेत आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले.

दरम्यान, पोलीस अंमलदार बालाजी काटे आणि महादेव शिंदे यांना गोपनीय माहितीदारामार्फत आरोपींपैकी एक इसम अतुलनगर चौक परिसरात थांबलेला असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, महादेव शिंदे आणि निखील तांगडे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुन्हा घडल्यानंतर अवघ्या तीस मिनिटांत आरोपींना ताब्यात घेत वारजे माळवाडी पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या जलद तपास आणि प्रभावी कारवाईची छाप उमटवली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील हे करत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश बोळकोटगी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, डेटिंग आणि सोशल चॅट अॅप्सद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे. अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्यासह पोलीस अंमलदार बालाजी काटे, शरद पोळ, निखील तांगडे, अमित जाधव, अमित शेलार, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे, सागर कुंभार आणि अमोल सुतकर यांनी सहभाग घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »