क्राईम

कोंढवे-धावडे येथे महाआरोग्य भव्य नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन; नागरिकांचा उदंड प्रतिसाद.


साद -प्रतिसाद ऑनलाईन.

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आणि कै. सिंधुताई आदिनाथ लांडगे यांच्या स्मरणार्थ कोंढवे-धावडे येथे भव्य नेत्रचिकित्सा व महाआरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. ‘स्वराज्यरक्षक शिवबांचे मावळे’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल १,६८० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या सामाजिक उपक्रमासाठी सिल्व्हर बर्च हॉस्पिटल, जतन फाउंडेशन, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय आणि मिनर्व्हा हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

शिबिरातील प्रमुख मोफत सुविधा व तपासण्या

– ८०० नागरिकांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली.- ५८० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.- ६४ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.- ३७८ नागरिकांचे मोफत ईसीजी (ECG) करण्यात आले.- नागरिकांसाठी मोफत बी.पी. तपासणी तसेच मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.- ४३३ नागरिकांच्या मोफत रक्त तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये शुगर, CBC, कॅल्शियम तसेच इतर तपासण्यांचा समावेश होता.- इतर सर्व रक्त तपासण्यांवर ५० ते ६० टक्के सवलत देण्यात आली.

– अत्यंत माफक दरात सीटी स्कॅन ₹२०० ते ₹५००, एमआरआय स्कॅन ₹२०० ते ₹४०० आणि सोनोग्राफी ₹२० ते ₹१५० या दरात उपलब्ध करून देण्यात आली.

यासोबतच, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांवर ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये मेंदूरोग, कर्करोग, अँजिओप्लास्टी, हृदयविकार, सांधे प्रत्यारोपण, मणक्याच्या शस्त्रक्रिया, किडनी विकार यांसह १५ हून अधिक गंभीर आजारांच्या मोफत शस्त्रक्रिया व उपचारांचा समावेश होता.

गरजू रुग्णांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले. या शिबिरामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना विविध आरोग्य तपासण्या व उपचारांचा मोठा लाभ मिळाला.

या कार्यक्रमाला नगरसेवक मा. काकासाहेब चव्हाण, अनिताताई इंगळे, सुभाषभाऊ नाणेकर, विकासनाना दांगट, स्वाती ताई पोकळे, सायली ताई वांजळे, किशोरभाऊ कांबळे, संदीपभाऊ मते, नितीनभाऊ धावडे, नितीनदादा वाघ, आनंद भाऊ मते, दिलीपभाऊ कदम, युवराजभाऊ वांजळे, महेशभाऊ पवळे, सलीमभाऊ शेख, राजूभाऊ राठोड, उमेशभाऊ कोकरे, छायाताई सरोदे, अमित चोरघे, संजय ठाकर, शंकर परदेशी, अविनाश शेलार तसेच एन. डी. ए. रोड सोसायटी महासंघाचे सर्व मान्यवर, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिराचे आयोजन प्रविण लांडगे, विशाल कडू, महेश कुलकर्णी, मनोज वानखडे, अक्षय पायगुडे, आर्यन लांडगे, यश जोशी, विनोद वानखडे, प्रल्हाद गुरव, रामचंद्र पायगुडे, विजय जोशी, रामदास वानखडे, रामरमेश यादव, विजय सिंग, भाग्येश पायगुडे, सागर राव, वैभव खाडिलकर आणि ‘स्वराज्यरक्षक शिवबांचे मावळे’ यांच्या वतीने करण्यात आले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »