सामाजिक

 स्व. रामभाऊ बराटे यांच्या स्मरणार्थ गेली अनेक वर्षांची परंपरा जपत ‘आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी पुरस्कार समारंभ’ २५ मे रोजी.


साद -प्रतिसाद ऑनलाईन.

पुणे : स्व. रामभाऊ बराटे यांच्या स्मरणार्थ गेली अनेक वर्षांपासून आयोजित करण्यात येणारा “आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी पुरस्कार समारंभ” यंदाही उत्साहात पार पडणार असून रविवार दिनांक २५ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता हॉटेल डेक्कन रॉयल, डेक्कन, पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

जिल्हा परिषद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री मा. ना. दादामामा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष मा. ना. अण्णा बनसोडे, जिल्हा परिषद पुणेचे अध्यक्ष मा. श्री. विश्वासराव जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू असलेल्या या पुरस्कार समारंभाने पुणे शहरात एक वेगळी ओळख निर्माण केली असून यंदाच्या सोहळ्याकडेही राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »