वारजे नगर श्रीराम वस्तीतील विराट हिंदू संमेलन – भक्ती आणि उत्साहाने न्हालेल्या संमेलनात १५०० जणांचा सहभाग.
साद -प्रतिसाद ऑनलाईन.
वारजे नगरामधील श्रीराम वस्ती येथे सकल हिंदू समाजातर्फे श्रीराम सोसायटीच्या भव्य प्रांगणात भव्य विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात साई मंदिर ते गणेश ध्यान मंदिरापर्यंत सौ स्वातीताई वर्तक यांच्या लेझीम पथकाने झाली.
सुवासिनींच्या हस्ते गोपूजन, आणि मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पूजन व आरती पार पडली. सौ संगिता देवचके व सहकारी महिलांनी श्रीगणेश व छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सादर केली.

संमेलनाचे संयोजक श्री विठ्ठलजी पासलकर यांनी प्रास्ताविकात हिंदुसंमेलन का आवश्यक आहे हे सोप्या भाषेत स्पष्ट केले. धर्माचार्य श्री रासपति दास यांनी हिंदू संस्कृती, सनातन धर्म, भगवद्गीता आणि संस्कृती जोपासना यावर मार्गदर्शन केले. सौ प्रतिमाताई चोळकर यांनी पंचपरिवर्तन आणि सामाजिक समरसता यावर प्रभावी मांडणी केली.
महानगर प्रचारक श्री रोहितजी अनंत रिसबुड यांनी संघाची कार्यपद्धती व त्याचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण बालगोपाळ मुले व मुलींनी सादर केलेले मल्लखांब होते, जे श्री जीवन करपे यांच्या ग्रुपने सादर केले. गणेश वंदना कथक नृत्यवेला (गुरू मेघना जोशी) व प्रभू रामचंद्रांची गाणी (सौ संगीता चौधरी) यांनी सादर केली.

सूत्रसंचालन सौ स्वातीताई वर्तक यांच्या सुश्राव्य वाणीत झाले, आभार प्रदर्शन सौ भाग्यश्री खवले यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम आणि महाप्रसादाने झाली.
या संमेलनात समाजातील सर्व घटकांचा सहभाग मोठ्या उत्साहाने नोंदवला गेला – सोसायटी पदाधिकारी, गणेश मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, सांस्कृतिक मंडळे, व्यापारी संघटना आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
विशेष मान्यवरांमध्ये आमदार भीमराव अण्णा तापकीर, श्री सुशील भाऊ मेंगडे, नगरसेविका सौ रेश्माताई बराटे, तेजश्रीताई पवळे, हर्षदाताई भोसले, श्री दिलीप भाऊ बराटे, श्री विठ्ठल अण्णा बराटे, श्री महेशभाऊ पवळे, श्री दत्ताभाऊ चौधरी, सौ वृषाली ताई चौधरी, सौ रोहिणी ताई भोसले, श्री वासुदेव भोसले आणि नगरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्रीराम वस्तीतील हिंदू संमेलन यशस्वी करण्यासाठी श्री वेदप्रकाश वेलानी, श्री संजयजी वाल्हेकर, श्री लक्ष्मण शिंदे, श्री हसमुख भाई पटेल, श्री श्रीकांत जोशी, श्री दयानंद पाटील, श्री ग्रीजेशजी गिरी, श्री प्रसाद गोडबोले, श्री तुषार करंजकर, श्री चंद्रशेखर अराणके, श्री धर्मेंद्र पटेल, नीता गायधनी, श्री खटावकर, श्री मंगेश देवचके यांनी दीड महिन्यापासून नियोजनबद्ध काम करून संमेलनाचे यश सुनिश्चित केले.


