२६ मार्च रोजी गणेशपुरी सोसायटीत श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्त भजन, महाआरती व महाप्रसाद.
साद – प्रतिसाद ऑनलाईन.
पुणे : वारजे माळवाडी येथील गणेशपुरी सोसायटी, लेन नं. ८ येथे श्रीराम प्रतिष्ठान व स्थानिक नागरिकांच्या वतीने गुरुवार दि. २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक वातावरणात हा सोहळा साजरा होणार असून परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता प्रभू श्रीराम प्रतिमा पूजनाने होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता महाआरती होणार आहे.
कार्यक्रमानंतर रात्री ८ ते ११ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांच्या सहकार्याने करण्यात आले असून परशुराम यादव (संस्थापक अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा पार पडणार आहे. आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.


