क्राईम

पारसनाथ सिंह यांचे निधन : शतकभराच्या जीवनप्रवासाला शांत निरोप.


साद – प्रतिसाद ऑनलाईन.

वारजे, पुणे : येथील रहिवासी पारसनाथ मोलई सिंह (वय १००) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील खमपूर येथील रहिवासी असून प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती.

ते महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांचे चुलते (काका) होते. तसेच कोथरूड येथील वनाज कंपनीचे माजी अधिकारी ओ. पी. सिंह यांचे ते वडील आणि पत्रकार सचिन सिंग यांचे आजोबा होते.

त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »