Author: साद प्रतिसाद

सामाजिक

 स्व. रामभाऊ बराटे यांच्या स्मरणार्थ गेली अनेक वर्षांची परंपरा जपत ‘आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी पुरस्कार समारंभ’ २५ मे रोजी.

साद -प्रतिसाद ऑनलाईन. पुणे : स्व. रामभाऊ बराटे यांच्या स्मरणार्थ गेली अनेक वर्षांपासून आयोजित करण्यात येणारा “आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी

Read More
क्राईम

गे डेटिंग APP वर आधी चॅटिंग, मग सापळा; तरुणाला लुटणारे आरोपी अवघ्या तीस मिनिटांत वारजे पोलिसांच्या ताब्यात.

साद-प्रतिसाद ऑनलाईन. वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथील फिर्यादी यांना गे डेटींग अॅण्ड चॅट या अॅपद्वारे चॅटिंग करून बोलावून घेवून त्याला

Read More
क्राईम

गे अॅपवर आधी चॅटिंग, मग सापळा; तरुणाला लुटणारे आरोपी अवघ्या तीस मिनिटांत वारजे पोलिसांच्या ताब्यात पुणे : गे डेटिंग अॅण्ड चॅट अॅपवरून ओळख वाढवत तरुणाला भेटीसाठी बोलावून त्याला मारहाण करत मोबाईलद्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून चांदीची चैन हिसकावणाऱ्या आरोपींना वारजे माळवाडी पोलिसांनी अवघ्या तीस मिनिटांत ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली आहे. फिर्यादी यांना गे डेटिंग अॅण्ड चॅट अॅपवरून संपर्क साधत आरोपींनी भेटीसाठी बोलावले होते. ठरलेल्या ठिकाणी आल्यानंतर फिर्यादी यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी मोबाईलद्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून घेतले तसेच त्यांच्या गळ्यातील चांदीची चैन हिसकावून पसार झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश बोळकोटगी यांनी तात्काळ तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी फिर्यादींकडून माहिती घेत आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. दरम्यान, पोलीस अंमलदार बालाजी काटे आणि महादेव शिंदे यांना गोपनीय माहितीदारामार्फत आरोपींपैकी एक इसम अतुलनगर चौक परिसरात थांबलेला असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, महादेव शिंदे आणि निखील तांगडे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या तीस मिनिटांत आरोपींना ताब्यात घेत वारजे माळवाडी पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या जलद तपास आणि प्रभावी कारवाईची छाप उमटवली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील हे करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश बोळकोटगी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, डेटिंग आणि सोशल चॅट अॅप्सद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे. अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्यासह पोलीस अंमलदार बालाजी काटे, शरद पोळ, निखील तांगडे, अमित जाधव, अमित शेलार, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे, सागर कुंभार आणि अमोल सुतकर यांनी सहभाग घेतला.

साद – प्रतिसाद ऑनलाईन. पुणे : गे डेटिंग अॅण्ड चॅट अॅपवरून ओळख वाढवत तरुणाला भेटीसाठी बोलावून त्याला मारहाण करत मोबाईलद्वारे

Read More
आरोग्यक्राईम

वारजे–कर्वेनगर वॉर्ड ऑफिस परिसरात अस्वच्छतेचा गंभीर प्रकार; दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आढळल्याने व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.

साद – प्रतिसाद ऑनलाईन. पुणे | प्रतिनिधी : वारजे–कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या खालील मजल्यावरील परिसरात प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अस्वच्छतेची गंभीर व चिंताजनक

Read More
क्राईम

दुचाकी चोरीचा पर्दाफाश : वारजे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक, अल्पवयीनाकडून १० मोटारसायकली जप्त.

साद -प्रतिसाद ऑनलाईन. पुणे : वारजे माळवाडी पोलिसांनी दुचाकी चोरीच्या घटनांवर मोठी कारवाई करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याच्याकडून

Read More
क्राईम

पारसनाथ सिंह यांचे निधन : शतकभराच्या जीवनप्रवासाला शांत निरोप.

साद – प्रतिसाद ऑनलाईन. वारजे, पुणे : येथील रहिवासी पारसनाथ मोलई सिंह (वय १००) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते

Read More
क्राईम

व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजकडून ₹42 कोटींची गुंतवणूक फसवणूक; दोन संचालकांवर गुन्हा.

साद – प्रतिसाद ऑनलाईन. पुणे : शहरात मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW)

Read More
क्राईम

मुठा नदीपात्र सफाईची मागणी; बाबा भिडे पुलाचे काम कधी पूर्ण होणार ? संदीप खर्डेकर.

साद -प्रतिसाद ऑनलाईन. पुणे : शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने पावसाळ्यापूर्वी तातडीने सफाई करावी, अशी

Read More
ताज्या घडामोडी

आई उमराई देवी उत्सव 2026 निमित्त 16 नामांकने, 6 पुरस्कार विजेते ‘धाराऊ’चे लेखक दिग्दर्शक मनिष शिंदे यांचा विठ्ठलवाडीत गौरव.

साद -प्रतिसाद ऑनलाईन. पौड (ता. मुळशी) : आई उमराई देवी उत्सव 2026 निमित्त विठ्ठलवाडी, पौड, मुळशी येथील ग्रामस्थांच्या वतीने लेखक-दिग्दर्शक

Read More
क्राईम

‘स्वबोध’ हीच विकसित भारताची खरी दिशा – जे. नंदकुमार.

साद – प्रतिसाद ऑनलाईन. पुणे : विकसित भारताचा मार्ग केवळ आर्थिक प्रगतीत नसून तो ‘स्व’च्या जागृतीत आहे, असा ठाम विचार

Read More
Translate »