शहर

गणपती माथा–वारजे मुख्य रस्त्यावर धोकादायक स्पीड ब्रेकर; चिन्हांकन नसल्याने अपघातांचा धोका


साद प्रतिसाद | पुणे प्रतिनिधी

गणपती माथा ते वारजे माळवाडी मुख्य रस्ता हा अत्यंत वर्दळीचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाकडून अनेक ठिकाणी मोठे स्पीड ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. मात्र या स्पीड ब्रेकरवर नियमाप्रमाणे पांढरे परावर्तक पट्टे किंवा योग्य चिन्हांकन करण्यात आलेले नसल्याचे दिसून येत आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी हे स्पीड ब्रेकर वाहनचालकांना स्पष्टपणे दिसत नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात. त्यामुळे काही ठिकाणी किरकोळ अपघातांच्या घटना घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

महापालिकेच्या पथ विभागाने स्पीड ब्रेकर उभारले असले तरी त्यावर आवश्यक असलेले परावर्तक पट्टे, सूचना फलक किंवा चेतावणी चिन्हे लावण्याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

तरी संबंधित विभागाने तातडीने या स्पीड ब्रेकरवर परावर्तक पट्टे मारून योग्य सूचना फलक बसवावेत, अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »