राजकीय

नगरसेविका हर्षदा शंतनु भोसले यांच्या पाठपुराव्याने वारजे माळवाडीतील प्रस्तावित पोलिस स्टेशनचा प्रश्न अधिवेशनात.


 

पुणे : वारजे माळवाडी प्रभाग क्र. ३२ मधील सर्व्हे नं. १११ येथे प्रस्तावित पोलिस स्टेशन उभारणीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे पोलिस स्टेशन तातडीने उभारणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

वारजे माळवाडी परिसराच्या नगरसेविका हर्षदा शंतनु भोसले यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या मागणीनुसार कार्यक्षम आमदार भिमराव आण्णा तापकीर यांनी राज्य विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करत शासनाकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

वारजे माळवाडी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतंत्र पोलिस स्टेशन उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत असून, शासनाने याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे, अशी माहिती वासुदेव शिवाजी भोसले, अध्यक्ष – भाजप प्रभाग क्र. ३२, वारजे माळवाडी यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »