वारजे माळवाडीत ‘संपूर्ण हिंदू समाज’ महासंमेलन; २२ मार्चला गणपती माथा वस्तीत भव्य आयोजन.
साद – प्रतिसाद ऑनलाईन.
सनातन संस्कृती, धर्म आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारे कार्यक्रम…..
वारजे माळवाडी परिसरातील गणपती माथा वस्तीत ‘संपूर्ण हिंदू समाज’ या संकल्पनेतून भव्य हिंदू महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २२ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार असून परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
हिंदू जागृती चळवळीला नवी ऊर्जा देणे तसेच सनातन संस्कृती, सनातन धर्म आणि सामाजिक एकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा या महासंमेलनामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमात विविध मान्यवरांची व्याख्याने, कलागुण प्रदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. गुलाबराव तुकाराम वांजळे शाळेच्या मैदानावर, अहिरेगाव वारजे माळवाडी येथे हा कार्यक्रम होणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


