शिवणे–उत्तमनगर–कोंढवे धावडे गावातील विकासकामांबाबत प्रश्नचिन्ह? 2025–26 मधील कामांच्या चौकशीची नागरिकांची मागणी.
साद – प्रतिसाद | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेच्या वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सन 2025 ते 2026 या कालावधीत रस्ते, मलनिस्सारण वाहिनी, फुटपाथ तसेच डांबरीकरणाच्या विविध विकासकामांसाठी टेंडर मंजूर करण्यात आल्याची माहिती उपलब्ध आहे. मात्र शिवणे, उत्तमनगर आणि कोंढवे धावडे या परिसरांमध्ये काही ठिकाणी या कामांची प्रत्यक्ष स्थिती काय आहे, याबाबत स्थानिक नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
परिसरातील काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मंजूर झालेल्या विकासकामांपैकी काही कामे अपेक्षित गतीने पूर्ण झाली आहेत का याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या कामांची अधिकृत तपासणी झाल्यास प्रत्यक्ष परिस्थिती स्पष्ट होईल, असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, 2025–26 या कालावधीत मंजूर झालेल्या रस्ते, मलनिस्सारण वाहिनी, फुटपाथ व डांबरीकरणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवणे, उत्तमनगर आणि कोंढवे धावडे परिसरातील काही नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडल्यास नागरिकांमधील संभ्रम दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


