ताज्या घडामोडी

टेंडर लागले, पण कामे कुठे? वारजे-कर्वेनगरमधील विकासकामांबाबत संशय.


साद – प्रतिसाद ऑनलाईन.

पुणे | प्रतिनिधी

2025-26 या कार्यकाळात वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या विकासकामांबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कागदोपत्री अनेक कामांना टेंडर लागल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात ही कामे किती टक्के पूर्ण झाली, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

माहितीनुसार, काही कामांना टेंडर लागल्यानंतरही ती प्रत्यक्षात पूर्ण झाली नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काही ठिकाणी ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून सत्य परिस्थिती समोर आणण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, या काळात पुणे महानगरपालिकेमध्ये कोणतेही नगरसेवक नसल्याने संपूर्ण कारभार प्रशासनाकडेच होता. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या थेट देखरेखीचा अभाव जाणवत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. परिणामी काही कामांच्या गुणवत्तेबाबत आणि अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

दरम्यान, काही अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाच्या कामांवरही बिल काढण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. त्यामुळे टेंडर लागलेली कामे प्रत्यक्षात किती झाली आणि विकासकामांचा खरा हिशोब काय, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »