आरोग्य

कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात; वारजे-कर्वेनगरमधील आरोग्य निरीक्षकाच्या निलंबनाची मागणी.


साद प्रतिसाद | पुणे

 

पुणे महानगरपालिकेच्या वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्वच्छता काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेला ओला व सडलेला कचरा हाताने उचलताना काही कर्मचाऱ्यांकडे हातमोजे, मास्क किंवा इतर आवश्यक सुरक्षात्मक साधने नसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे काम करताना संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Oplus_16908288

विशेष म्हणजे हा प्रकार सदर ठिकाणी संबंधित आरोग्य निरीक्षक उपस्थित असतानाच घडल्याचे समोर आले आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याने संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करता येणे गरजेचे असताना अशा प्रकारे सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित आरोग्य निरीक्षकाला तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षात्मक साधने उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »