ताज्या घडामोडी

अहिरे गाव पाच दिवस अंधारात; नागरिकांची सुरक्षा धोक्यात


साद – प्रतिसाद ऑनलाईन.

मलणीसारण वाहिनीतील तुटलेल्या लाईन्समुळे घराघरात अंधार, ठेकेदाराच्या चुकीमुळे विद्युत विभागाला सवाल

अहिरे गावातील रहिवासी गेल्या पाच दिवसांपासून विजेच्या तुटवड्यामुळे अंधारात अडकले आहेत. गावातील मलणीसारण वाहिनीवरील काम सुरू असतानाही, विद्युत विभागाच्या माहितीनुसार दोन्ही लाईन ठेकेदाराच्या चुकीमुळे तुटल्या आहेत.

स्थानिकांचे म्हणणे आहे की, अशा परिस्थितीत नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन तातडीने लाईट चालू केली पाहिजे होती. अंधाराचा फायदा घेऊन चोरीसारख्या अवैध घटना घडण्याची शक्यता वाढते, तसेच अपघात होण्याची भीती देखील आहे.

स्थानीयांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा आणि विद्युत विभागाने त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अद्याप विभागाकडून औपचारिक प्रतिक्रिया आलेली नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »