साद प्रतिसादचा इम्पॅक्ट : बातमीची तात्काळ दखल, पुणे मनपाकडून स्पीड ब्रेकरवर चिन्हांकन पूर्ण.
साद – प्रतिसाद ऑनलाईन.
पुणे : शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर असूनही त्यावर योग्य चिन्हांकन नसल्यामुळे वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढत आहे. यासंदर्भात साद प्रतिसाद या आपल्या पोर्टलवर काल सविस्तर बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
या बातमीची तात्काळ दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने त्वरीत कार्यवाही केली. संबंधित ठिकाणी स्पीड ब्रेकरवर थर्मोप्लास्ट पेंटद्वारे स्पष्ट चिन्हांकन करण्यात आले असून काम कालच पूर्ण करण्यात आले.
स्पीड ब्रेकर स्पष्ट दिसावेत आणि वाहनचालकांना दूरवरूनच त्याची कल्पना यावी यासाठी हे चिन्हांकन करण्यात आले आहे. त्यामुळे आता त्या परिसरातील अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.

स्थानिक नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त करत साद प्रतिसाद पोर्टलने उपस्थित केलेल्या प्रश्नाची दखल घेऊन पुणे मनपाने तातडीने कार्यवाही केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम साद प्रतिसाद सातत्याने करत असून या बातमीमुळे प्रशासनाने त्वरित कार्यवाही केल्याने पोर्टलचा सकारात्मक परिणाम पुन्हा एकदा दिसून आला आहे.


