क्राईम

परमहंस नगर, कोथरूड येथे भव्य हिंदू संमेलन; गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन.


साद – प्रतिसाद ऑनलाईन.

कोथरूडमधील परमहंस नगर परिसरात हिंदू समाजाच्या एकतेसाठी व जनजागृतीसाठी भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाअंतर्गत आयोजित व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प २६ मार्च रोजी संध्याकाळी आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात “जीवन सुंदर आहे” या उपक्रमातून प्रसिद्ध असलेले वक्ते गणेश शिंदे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम परमहंस नगर येथील जीत मैदान येथे पार पडणार असून, हिंदू समाजातील ऐक्य, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे संयोजन संदिप डेअरी फार्म व गीतांजली सुपर मार्केट यांच्या वतीने करण्यात आले असून, सकल हिंदू समाज, परमहंस नगर यांच्या वतीने नागरिकांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »