बावधानमध्ये भव्य हिंदू संमेलन उत्साहात; “हिंदूंनी एकत्र आले पाहिजे, तसेच एकत्र दिसले पाहिजे” – विनायकराव डंबीर.
साद -प्रतिसाद ऑनलाईन.
पुणे : बावधान येथील दत्त मंदिर वस्ती, SNBP स्कूल परिसरात आयोजित भव्य हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे ६५० नागरिक उपस्थित होते, तर ४० कार्यकर्त्यांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी धर्माचार्य ह.भ.प. श्री युवराज गिरी गोसावी यांनी मार्गदर्शन करत धर्म, संस्कृती आणि एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्य वक्ते विनायकराव डंबीर यांनी “आपण हिंदूंनी एकत्र आले पाहिजे, तसेच एकत्र दिसले पाहिजे” हा प्रभावी संदेश देत समाजातील एकजुटीची गरज स्पष्ट केली.
मातृशक्ती वंदनाच्या सत्रात सुप्रिया देशपांडे यांनी हिंदू संस्कारांचे महत्त्व सांगताना नमस्कारापासून आशीर्वादापर्यंतच्या परंपरांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या विचारांना उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली.
या संमेलनास अविनाश बडगे, प्रसाद परळीकर, किरण दगडे पाटील, दिलीप अण्णा वेडे पाटील आणि गोरख दगडे पाटील यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा देवपुरकर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन विराज बोराळकर यांनी मानले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून “महाराष्ट्राची लोकधारा” या विषयावर सादरीकरण, भारूड, देशभक्तीपर नृत्य व गीते यांना उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. आचार-विचार, विहार आणि औषधोपचार यांचे महत्त्वही वक्त्यांनी स्पष्ट केले. देशभक्तीपर छायाचित्रांचे प्रदर्शन आणि पुस्तक विक्रीलाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सांगता सर्वांनी एकत्रित “वंदे मातरम्” म्हणत देशभक्तीपूर्ण वातावरणात करण्यात आली. शेवटी रुचकर भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


