क्राईम

MPDA अंतर्गत सराईत गुन्हेगार जेरबंद; वारजे माळवाडी पोलिसांची धडक कारवाई.


साद – प्रतिसाद ऑनलाईन.

पुणे : वारजे माळवाडी पोलीस ठाणे हद्दीत वारंवार गुन्हे करून परिसरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या सराईत गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई करत त्यास जेरबंद करण्यात आले आहे.

सदर आरोपीवर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज साळुंखे, पोलीस अंमलदार विजय खिलारी व किरण तळेकर यांनी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करून तो पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता.

दि. २७ मार्च २०२६ रोजी MPDA आदेश प्राप्त होताच पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत चतुराईने कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त संभाजी कदम व सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या सूचनेनुसार पार पडली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, मनोज साळुंखे व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »