शहर

२५ वर्षांच्या वैभवशाली परंपरेतून मा. दिलीप बराटे यांच्या नेतृत्वात २७ ते २९ मार्चदरम्यान पुण्यात भव्य रौप्यमहोत्सवी साहित्यिक कलावंत संमेलन


साद – प्रतिसाद ऑनलाईन.

 

पुणे : साहित्य, कला आणि संस्कृतीच्या जतनासाठी कार्यरत असलेल्या साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने २५वे रौप्यमहोत्सवी साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे नेतृत्व व आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. दिलीप बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

हे संमेलन दि. २७, २८ व २९ मार्च २०२६ या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड येथे संपन्न होणार आहे.

संमेलनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी सायंकाळी ४:३० वाजता होणार आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या संमेलनात विविध साहित्यिक कार्यक्रम, काव्यवाचन, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

पुणेकर साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »