सामाजिक

परभणीतील वर्षभरापासून बेपत्ता असलेली १५ वर्षीय मुलगी पुण्यात सुखरूप सापडली; पोलिस व महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपच्या प्रयत्नांना यश.


साद – प्रतिसाद ऑनलाईन

णे, दि. २१ मार्च २०२६ :

परभणी जिल्ह्यातील काष्टागाव येथून सुमारे एक वर्षापूर्वी बेपत्ता झालेली १५ वर्षीय मुलगी अखेर पुणे परिसरात सुखरूप आढळून आली आहे. वंदना देविदास साळवे असे मुलीचे नाव असून ती परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग प्रकरणातील होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० एप्रिल २०२५ रोजी दुपारी सुमारे १२:३० वाजता वंदना ही काष्टागाव (जि. परभणी) येथील राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. त्यानंतर तिचा शोध सुरू होता. दरम्यान, दि. २१ मार्च २०२६ रोजी पुणे परिसरात मुलगी असल्याची माहिती परभणी पोलिसांना मिळाली.

तपासादरम्यान एका हॉटेल व्यावसायिकाने परभणी पोलिसांना महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे अध्यक्ष शिवाभाऊ पासलकर यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर शोध मोहिमेला वेग आला.

शिवाभाऊ पासलकर यांनी भारतीय विद्यापीठ परिसरात जाऊन स्थानिक पोलिसांची मदत घेतली. शोधमोहीम सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वर्षभरापासून बेपत्ता असलेली वंदना ही कात्रज चौक, पुणे परिसरात आढळून आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपच्या मदतीने तिला ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलीला सुखरूपपणे परभणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या शोधकार्यात परभणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे स.पो.नि. राजगुरू, पोलीस हवालदार सुधीर डोंबे, शंकर जाधव तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे व पोलीस अधिकारी किरण देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.

या यशस्वी कारवाईनंतर परभणी पोलिसांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे अध्यक्ष शिवाभाऊ पासलकर यांचे मनापासून आभार मानले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »